मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खुलेपणाने बोलले. २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील, असे ते म्हणाले. मात्र, निवडणुकीत पक्षाचा चेहरा कोण असेल, हे पक्षातील जनताच ठरवेल, असे फडणवीस म्हणाले. एकनाथ शिंदे आणि आपण पुढील निवडणूक एकत्र लढणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. (devendra fadnavis has said that eknath shinde will be the chief minister in 2024 as well)

२०२४ च्या निवडणुकीत महाराष्ट्र सरकारचा चेहरा कोण असेल असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला, त्यावर ते म्हणाले, 'एकनाथ शिंदे आणि आम्ही एकत्र निवडणूक लढवू. आमच्याकडे हुकमाचा एक्का आहे. तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्या चेहऱ्यासोबत कोणताही चेहरा जोडा, तो आपोआप पुढे जाईल.