पणजी : देशात थंडीचे आगमन झाले आहे आणि ३१ डिसेंबरजवळ येत आहे, तसा पर्यटकांचा ओघ हा गोव्याकडे वळत आहे. फक्त देशातीलच नव्हे तर विदेशातील पर्यटकही गोव्याला येतात. पण गोव्याला जाण्याचा विचार करणाऱ्या पर्यटकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. गोवा सरकारने समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी मोठे पाऊल अचलले असून यासंबंधी नियमही जारी केले आहेत. गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांना दरू पिण्यास आणि अन्न शिजवण्यास (जेवण बनवण्यास ) मनाई करण्यात आली. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. गोवा सरकारने यासंदर्भात सोमवारी आदेश जारी केले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आले आहेत.
गोवा सरकारच्या पर्यटन विभागाने यासंबंधी आदेश जारी केले आहेत. रस्त्यालगत अन्न शिजवणे किंवा तिकीट विक्री आणि गोव्याबाहेरील पर्यटनासाठी नागरिकांना पॅकेजेस देणे हा एक प्रकारे उपद्रव असल्याचे सरकारने म्हटले आहे. गोवा सरकार १० प्रकारच्या हालचालांवर बंदी घातली आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी जेवण बनवणे, समुद्र किनाऱ्यांवर कचरा फेकणे, किनाऱ्यांवर वाहनं चालवणे यासह दारू पिण्यावरही गोवा सरकारने बंदी घातली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यासर हजार, पाचशे नाही तर ५० हजारांचा जबर दंड पर्यटकांना भरावा लागू शकतो.



0 टिप्पण्या