चंद्रपूर: मकर संक्रांतीच्या मागील तारखा पाहिल्यास इसवीसन २७२ मध्ये मकर संक्रांत १४ जानेवारी रोजी येत असे. पुढे इसवीसन १००० मध्ये ती ३१ डिसेंबरला येत होती. नंतर गेल्या ५० वर्षांपासून संक्रांतीचा सण १४ जानेवारीला येत आहे. मात्र आता पुन्हा संक्रातीची तारीख बदलण्यात आली आहे. आता संक्रांत १५ तारखेला आली आहे. पुढील ९००० वर्षात संक्रांतीचा सण जूनमध्ये येणार आहे, अशी माहिती खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे. (Makar Sankranti 2023)
मकरसंक्रांत आणि उत्तरायण हे वेगवेगळ्या दिवशी येत असतात. २२ डिसेंबरला उत्तरायणची सुरुवात तर १४ जानेवारीला मकरसंक्रांत होत असते. बहुदा इस २७२ या वर्षात उत्तरायण आणि मकर संक्रांत २२ डिसेंबरलाच होत असावी. तेव्हापासून मकरसंक्रात हा सण १४ तारखेलाच साजरा केला जाते. बहुतेक उत्तरायण सण चंद्र कालगणना पध्दतीने साजरा केला जात असावा. परंतु मकरसंक्रांत ही सूर्य कालगणना पध्दतीने साजरी केली जाते. पूर्वी दोन्ही सण एकाच दिवशी येत असल्याने असे घडले असावे, असे चोपणे यांनी म्हटलं आहे.
0 टिप्पण्या