मुंबईः लहान मुलांमध्ये टीबीचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आलं आहे. शहरात प्रत्येकी दहा टीबीच्या रुग्णांमागे एका मुलाला टीबीचा संसर्ग झाल्याचे आत्तापर्यंतच्या अहवालात दिसून आलं आहे. टीबीचे रुग्ण वाढत असले तरी अद्याप बालरोग क्षय रुग्णांसाठी समर्पित असलेले आयसीयू सुरू करण्यात आले नाहीयेत. पुढील आठवड्यात आयसीयू सुरु करणार असल्याची शक्यता आहे.
बीएमसीने २०२२मध्ये जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मुलांमध्ये क्षयरोगाची प्रकरणे प्रत्येक वर्षात वाढत आहेत. २०१९ मध्ये एकूण ७% होते ते २०२१ मध्ये हे प्रमाण वाढून ९% झाले आहे. मुंबईत दरवर्षी ६०,००० नवीन टीबी रुग्णांची नोंद होते, असं एका आरोग्य कार्यकर्त्याने म्हटलं आहे.
मुलांमधील टीबीचे वाढते प्रमाण पाहून परळमधील बाई जेरबाई वाडिया रुग्णालयातील बाल क्षय रुग्णांसाठी येथे विशेष विभाग आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार, विभागात आठ खाटांचे टीबी आयसोलेशन युनिट व दोन ICU बेडसह विस्तारित करण्यात येणार आहे. मुलांसाठी समर्पित आयसीयू तयार करणारे आमचं कदाचित देशातील पहिलं रुग्णालय आहे,” असे सीईओ डॉ मिनी बोधनवाला यांनी सांगितले.
0 टिप्पण्या