दिल्ली पोलिसांनी जहांगीरपुरी (Jahangirpuri) येथून दोन दहशतवाद्यांना अटक (Two Terrorist Arrested) केली होती. हे दोघे ISI साठी काम करत असल्याचं चौकशीमध्ये समोर आले आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने प्रजासत्ताक दिनापूर्वी दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उघडकीस आणला आहे. जहांगीरपुरी येथून अटक करण्यात आलेल्या संशयितांची चौकशी केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी हरकत उल अन्सार आणि खलिस्तान टायगर फोर्स यांचे संबंध असल्याचा खुलासा केला आहे. हे दोन्ही दहशतवादी गट पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI च्या आश्रयाखाली तयार करण्यात आली आहे, ज्याचा उद्देश भारतात दहशत पसरवणे आहे, असेही दिल्ली पोलिसांच्य स्पेशल सेलने सांगितलं आहे. तीन तुकडे केलेला एक मृतदेह आढळला जहांगीरपुरी येथून अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून हातबॉम्ब जप्त करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी भालस्व डेअरीवर छापेमारी केली आणि दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. दोघांनी दिलेल्या माहितीवरून भालसवा नाल्यातून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. नाल्यामध्ये एका मृतदेहाचे तीन अवशेष आढळून आले आहेत. या दोन्ही संशयितांनीच ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.