जळगाव : जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्यावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी शुक्रवारी जळगावातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात एका २८ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत रामानंद नगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा वास्तव्याला असून तेथे तो शिक्षण घेत आहे. १२ जानेवारी रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्याला एका मोबाईल क्रमांकवरील गुड्डू नावाच्या अंदाजे २८ वर्षीय तरुणाने १२ जानेवारी रोजी जळगाव शहरात बोलवून घेतले. त्यानंतर अल्पवयीन मुलाला जळगाव शहरातील एका भागात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केल आहे. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर घाबरलेल्या पीडित मुलाने हा प्रकार त्याच्या कुटुंबीयांना सांगितला. पिडीत मुलगा, त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी तक्रारीसाठी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. तसेच संबंधित तरुणावर कारवाईची मागणी केली. याप्रकरणी त्याच्या तक्रारीवरून गुड्डू नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.