परभणी : तुम्ही मला नेहमीच का काम सांगता, असे म्हणत मुलाने आधी वडिलांना अगोदर शिवीगाळ केली. त्यानंतर शेण काढण्याच्या खोऱ्याचा दांडा डोक्यात मारून जखमी केले. ही घटना परभणीच्या मानवत येथे घडली आहे. याप्रकरणी रामभाऊ बाबुराव शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुलगा पाराजी शिंदे याच्या विरोधात मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. मानवत येथील चौधरी मळा भागात राहणारे रामभाऊ बाबुराव शिंदे हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह सोनाजी हिबारे यांच्या शेतामध्ये राहतात. रामभाऊ शिंदे हे बैल आणि वासराला पाणी पाजत असताना त्यांचा मुलगा पाराजी शिंदे हा ठिकाणी आला. त्यामुळे रामभाऊ शिंदे यांनी पाराजीला म्हशी आणि शेळ्याला पाणी पाजव, असे सांगितले. वडिलांनी काम सांगितल्याने पाराजीला राग आला. तुम्ही नेहमी मलाच का काम सांगता, असे म्हणत शिवीगाळ केली.